तो एक दिवस…
आयुष्य म्हणजे lifeline, यात जसे चढ उतार असतात तसेच आपल्या
आयुष्यात पण येत असतात. याचा पुरेपूर अनुभव मी या 2 दिवसात घेतला. रोजच्या routine आणि boring life मधून जरा ब्रेक हवा होता. पण आपल्या सर्वांनाच माहित आहे कि Software मध्ये काम
करत असलेल्यांच्या व्यथा. सुट्टीचे नुसते नाव काढले तरी manager च्या अंगावर कसा
काटा येतो ते. आता खूप झाले होते बरेच दिवस मागे लागून सुद्धा सुट्टीचा योग काही
जुळून येत नव्हता. शेवटी manager बरोबर बोलून असे ठरले कि 4 आठवड्याचे काम 2
आठवड्यात करून 1 आठवडा सुट्टी घ्यायची. मग लगोलग कामाला लागलो आणि भगीरथ प्रयत्न
करून मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर उपभोग घेण्यासाठी Singapore & Malaysia चा
मस्त plan बनवला. Software मधेच काम करत असल्यामुळे सगळे काही online बुकिंग केले. Ticket, Visa, Insurance आणि कॅब बुकिंग असे सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पडले. सर्वकाही plan प्रमाणे सुरळीत चालू होते. Ticket, Visa, Insurance पासून सगळे काही हातात होते आता फक्त मुंबई ला जाऊन Air India बरोबर हवेत उडायचे बाकी होते. मी जाम खुशीत होतो.
बरेच दिवस प्रयत्न करून सर्वकाही नीट जुळून आले होते. पण सरळ रेषेत
चालेल तर ते आयुष्य कसले? याचा पहिलाच प्रत्यय मला मुंबईला निघताना आला . रात्रीचे
9.30 चे flight असल्यामुळे दुपारी 2 वाजता निघून आरामात पोचून Airport वर
फिरण्याचा प्लान होता म्हणून कॅब ला दुपारी 2 वाजताच बोलावले होते. पण 3.30 वाजले
तरी कॅब आली नव्हती मग जर काळजी वाटायला लागली होती. नुसते फोन वर फोन सुरु होते.
Google Map पेक्षाही कॅबचे location शोधणे सुरु होते. शेवटी 4.15 ला कॅब
वाले महाशय आले. तेव्हा कुठे जीवात जीव आला थोडाफार पण कॅब वाल्या मुलाकडे
पाहून असे वाटले कि हा काय पोचवणार आता वेळेत बहुतेक आता flight चुकणार आणि सगळ्या
ट्रीप चा बट्याबोळ होणार असेच वाटले. पण काय आश्यर्य गडी तरबेज निघाला आणि
सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत आमच्या गाडीची एक्ष्प्रेस्स वे वर
वाऱ्याशी स्पर्धा सुरु झाली. गाडीच्या स्पीडोमीटरचा काटा (140-150) या मधेच फिरत
होता. असे करत त्याने आम्हाला 7.10 लाच Airport ला पोचवले. त्याला
त्याचे बक्षिस देऊन मी विमानतळात प्रवेश केला.
Baggage check in, security checks
आणि emigration सारखे किचकट वाटणारे सोपस्कार पूर्ण करून मी विमानात
बसायची वाट पाहत होतो शेवटी सगळे संपवून मी विमानात बसलो
आणि 9.35 ला टेक ऑफ झाले. विमानाचा Singapore कडे via चेन्नई असा प्रवास सुरु झाला. थोड्याच वेळात हवाई सुंदरीने गरम गरम जेवण आणून दिले त्यावर ताव मारून मी Singapore कडे डोळे लावून बसलो. पण विमान चेन्नई ला थोडावेळ थांबणार होते. एकदा असे वाटले कि कशाला हा ब्रेक ठेवला आहे उगाचच? पण म्हणतात ना रावणाने सीतेला पळवले नसते तर रामायणच घडले नसते. तसेच काहीतरी रामायण माझ्यासोबत सुद्धा घडणार होते याची पुसटशी कल्पना पण मला नव्हती. एकदाचे विमान चेन्नईला थांबले आणि त्याचसोबत प्रवाशी व खाद्यपदार्थांची अदलाबदल सुरु झाली आणि सोबतच माझ्या रामायणाची सुद्धा. :(

मला पुढे Singapore ला जायचे असल्याने आम्हाला विमानातच बसायला सांगण्यात आले. मी सुद्धा माझ्या जागेवर बसून होतो. तेवढ्यात विमानाची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची फौजच विमानात दाखल झाली. मग मी सुद्धा माझ्या गळ्यात असलेली पासपोर्टची bag समोरच्या सीटच्या मागे असलेल्या कप्प्यात ठेवली आणि बाजूला गप्पा मारत उभा राहिलो. त्या bag मध्ये माझे (पासपोर्ट,visa, Boarding pass & currency) असे सर्वकाही होते. विमानाची साफसफाई झाल्यावर नवीन प्रवाश्यांचे विमानात आगमन
झाले.Announcement झाल्यावर मी पण पुन्हा माझ्या जागेवर जाऊन बसलो. विमान उडायला अजून 10 मि. अवकाश होता. सहजच माझी नजर समोरच्या कप्प्याकडे गेली आणि बघतो तर काय माझी सर्व कागदपत्रे असलेली bag तिकडून गायब झालेलीहोती. २ मि. माझी तर
पुरती गाळणच उडाली आणि म्हणले संपले सगळे एकदाचे. सगळी रंगवलेली स्वप्नं हवेतच विरतात कि काय असे वाटले. :( पण वेळीच मी सावरलो आणि हरवलेल्या bag ची कल्पना मी हवाई सुंदरी आणि वैमानिकाला दिली. सगळी कडे एकच गोंधळ सुरु झाला. bag ची शोधा शोध सुरु झाली. सर्वकर्मचाऱ्यांची धावपळ चालू होती मी सुद्धा माझ्या सीटच्या आजूबाजूचे सर्वकाही तपासून पहिले, साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा विचारून झाले होते पणपदरी निराशाच पडली. या सर्व गोंधळामुळे विमानाला अगोदरच 45 मि. उशीर झाला होता. शेवटी पुढील विलंब टाळण्यासाठी वैमानिक आणि Air India शीबातचीत होऊन मला एकट्याला चेन्नई Airport वर सोडून विमानाने Singapore च्या दिशेने उड्डाण केले.
सीतेच्या वियोगाने रामाची जशी अवस्था झाली असेल तशीच काहीशी अवस्था माझी झाली. मनात नाना प्रकारच्या विचारांनी थैमान मांडले होते. माझे सर्व काही हरवले होते passport, visa आणि currency सुद्धा. :( आता पुढे काय करायचे याचा मी विचार करत होतो. emigration ,customs वगैरेच्या महादिव्यातूनमला जावे लागणार होते ते सुद्धा जवळ कोणतीही कागदपत्रे नसताना. आता सर्वकाही Airlines कडून येणाऱ्या पत्रावर अवलंबून होते. तेवढ्यात Air India चे duty ऑफिसर Mr. Fazal च्या रूपाने देव माणूसच भेटला. ते Airlines चे पत्र घेऊन आले आणि अशा तऱ्हेने माझ्या चेन्नई Airport वरच्या exit ला सुरवातझाली होती. त्यांनी मला emigration आणि customs मधून सुखरूप बाहेर काढले. मी आता Airport च्या दारात होतो.
आता बाहेर पडून समोरच्या पोलिस स्टेशन मध्ये जाऊन FIR करायच्या तयारीत होतो. शेवटचा 1 try म्हणून मी त्यांना एकदा साफसफाई करणाऱ्या लोकांचे आणि त्यांनी जमा केलेल्या कचऱ्याचे security checking करण्याची विनंती केली. आणि मी Mr. Fazal यांच्याबरोबर Air India च्या ऑफिस मध्ये जाऊन बसलो. अंदाजे तासाभरानंतर ऑफिस मधला फोन खणाणला आणि समजले कि माझी हरवेली bag एका कर्मचाऱ्याकडे सापडली. माझ्या तर आनंदाला पारावारच राहिला नाही आणि पुन्हा एकदा माझ्या चेहऱ्यावर हास्य उमटले. थोड्याच वेळात पोलिस आणि Air India चे ऑफिसर माझी bag घेऊन ऑफिस मध्ये आले. ती bag आणि त्यातले सगळे सामान सुखरूप आहे हे पाहून माझा जीव एकदाचा भांड्यात पडला. पण आता पुढे काय याचा विचार सुरु झाला.
माझ्या समोर 2 - 3 पर्याय होते. एक तर पुन्हा एकदा मुंबईला जाऊन नवीन तिकीट काढून
Singapore ला जायचे. दुसरा परत मुंबईला जाऊन घरी पुण्याला जायचे नाहीतर चेन्नई वरून दुसऱ्या Air Lines चे तिकीट काढून
Singapore ला जायचे. पण हे सगळे खर्चिक पर्याय होते. आणि माझी काहीही चूक नसताना मला हा सगळा मनस्ताप सहन
करावा लागत होता. अजून काही दुसरा मार्ग आहे का यासाठी माझी Air India च्या ऑफिसर्स बरोबर चर्चा सुरु होती आणि या सर्वातून 1
सुवर्णमध्य काढण्यात आला. तात्पुरता
transit visa देऊन मला चेन्नई Air Port वरील transit area मध्ये बसण्यात सांगण्यात आले. आहे त्याच तिकिटावर मला नवा बोर्डिंग पास देण्यात आला पण माझे पुढचे विमान दुसऱ्यादिवशी रात्री 11.45 ला होते आणि तोपर्यंत मला transit area
मधेच वाट बघणे भाग होते. भारतीय नागरिक असून सुद्धा मला भारतात फिरण्यास मनाई करण्यात आली होती. त्यावेळी असे वाटले कि किती जाचक असतात हे सगळे laws आणि
rules.

एवढे सगळे होईपर्यंत सकाळचे ६ वाजले होते. तेव्हापासून माझे चेन्नई Air Port वरील transit area मधले आयुष्य सुरु झाले होते. एक एक तास जणू एक एक दिवसासारखा वाटत होता. Air Lines ने खाण्यापिण्याची सोय केली होती. पण आराम करता येईल असे काहीच त्यात रूम मध्ये नव्हते. नुसत्या बसायला खुर्च्या होत्या. त्यावर धड झोपता पण येत नव्हते. खूपच कंटाळा आला होता. मोबाईल वर पण गेम्स खेळून कंटाळा आला होता. तेवढयात माझ्या मोबाईल ची battery पण

संपली. दुष्काळात तेरावा महिना यावा असेच काहीतरी माझ्या बाबतीत घडत होते. शेवटी तिकडच्या सुरक्षारक्षकाला सांगून मी युनिव्हर्सल चार्जर विकत घेतला आणि पुन्हा एकदा माझा मोबाईल वर टाईमपास सुरु झाला. हा सर्व घडलेला प्रसंग जणू एक वाईट स्वप्नंच वाटावे असाच घडला होता आणि त्याला शब्दांत उतरवण्याची ईच्छा झाली म्हणूनच transit area मध्ये वाट पहात असतानाच तिकडूनच हातातल्या तिकीटावर हा लेख लिहित आहे. अजून विमान यायला सात तासांचा अवधी आहे बघू आता ते कसे सरतात ते? इंद्रधनुष्याच्या सात रंगान सारखे सुखद सरावेत हिच मनोमन प्रार्थना करत आहे .

एकाच दिवसात पाहिलेल्या या चढ उतारांमुळे आपले आयुष्य किती अनिश्चित आहे याची मला मनोमन खात्रीच पटली. आणि या एका दिवसाने आपले आयुष्य कसे जगावे हेच जणू दाखवून दिले. Air India चे कर्मचारी आणि ऑफिसर्सनी केलेली मदत आणि दिलेला धीर माझ्यासाठी जणू एक सुखद अनुभवच ठरला. मी मात्र आता पुन्हा एकदा आपण ठरवलेल्या गोष्टी कश्या आणि कधी करता येतील याचाच विचार करत बसलो आहे आणि मी रंगवलेल्या परीकथेत रममाण होयला लागलो आहे. … :) :)
………..
पंकज गुजर

mast ahe post...
ReplyDeletenawin blog sathi shubhechcha!
tujhya kawita pan yayla havyat blogwar.
mast hai blog post :) , looking forward to more :) ..
ReplyDeletenice :-) Can't stop laughing.. Wish there was a picture from the baggage claim with the opened bag too :-)
ReplyDelete